देऊळगाव घुबे, अमोना, पिंपळवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास गावावर ड्रोनच्या घिरट्या? पोलीस अनभिज्ञ! गावकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण
Sep 27, 2024, 22:41 IST
देऊळगाव घुबे (ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातच नव्हे मराठवाडा परिसरातील अनेक गावांवर रात्रीच्या सुमारास ड्रोनच्या घिरट्या चालू असल्याच्या बातम्या येत आहेत. आता रात्री देऊळगाव घुबे, पिंपळवाडी , अमोना या गावांवर रात्रीच्या सुमारास ३ ते ४ ड्रोन घिरट्या घालत होते. गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या संदर्भात बुलडाणा लाइव्ह ने पोलिसांशी संपर्क साधला असता पोलीस या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचे समोर आले.
ड्रोन कोण फिरवत आहे? का फिरवत आहे? यांबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भीतीमुळे गावातील तरुण रस्त्यावर उतरले असून खबरदारीचा उपाय म्हणून तरुण गावाचे राखण करत आहेत.