डोणगाव हादरले! ३२ वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार; जबरदस्तीने खोलीत नेले अन्....

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मानसिक संतुलन बिघडलेल्या ३२ वर्षीय महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही धक्कादायक घटना डोणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात घडली. या प्रकरणी महादेव गोविंदा मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पीडित महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, तिची विवाहित मुलगी गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. पतीच्या निधनानंतर ती माहेरी राहत होती. दरम्यान, ८ मे रोजी गावातील काही नागरिकांनी पीडितेच्या कुटुंबीयांना तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली.
यानंतर महिलेच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडितेने महादेव मोरे याने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे सांगितले. पीडितेच्या जबाबानुसार, आरोपीने तिला जबरदस्तीने एका खोलीत नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे डोणगाव पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.