दारूला पैसे दिले नाही म्हणून कुणी असे करते का? गाडीला लाथ मारून खाली पाडले,तोंडावर मारला बुक्का अन् चाकू.... येळगाव फाट्यावर सवच्या तरुणांमध्ये राडा...
Jan 23, 2025, 11:32 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दारूला पैसे दिले नाही म्हणून चाकूने वार केल्याचा प्रकार येळगाव फाट्यावर घडला आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
प्राप्त माहितीनुसार सव येथील फिरोज शहा शब्बीर शहा (२६, रा. सव) हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. फिरोज दूध आणण्यासाठी मोटारसायकलने येळगाव फाट्यावर गेला होता. त्यावेळी सव येथीलच लक्ष्मण दत्तात्रय पवार याने आवाज देऊन फिरोजला थांबवले. दारू पिण्यासाठी पैसे मागितले.. फिरोजने पैसे नाही असे सांगितले असता लक्ष्मण ने फिरोजच्या गाडीवर लाथ मारली, त्याला खाली पाडले, तोडांवर बुक्का मारला आणि हातातील चाकूने कानावर वार केले, त्यामुळे कानातून रक्त निघाल्याचे फिरोजने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.. जळगाव फाट्यावरील लोकांनी दोघांचे भांडण सोडवल्यानंतर फिरोजने बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून लक्ष्मण पवार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...