शेतातून जाण्यावरून वाद, पती,पत्नीला मारहाण; चार जणांविरुध्द गुन्हा दाखल; देऊळगाव महि शिवारातील घटना...

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतातून जाण्यावरून वाद होवून चौघांनी पती,पत्नीस मारहाण केल्याची घटना देऊळगाव महि शिवारात 10 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
 
देऊळगाव महि येथील भानुदास एकनाथ इंगळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे भाऊ देविदास इंगळे  व भावजय रंजना इंगळे हे 10 डिसेंबर रोजी कापूस घेवून येत होते . यावेळी त्यांना आरोपी  योगेश अंबादास इंगळे ,अनुराधा योगेश इंगळे, अंबादास एकनाथ इंगळे व  मंगला अंबादास इंगळे सर्व रा. देउळगावमही ता. देउळगांव राजा यांनी हटकले. तसेच शेतातून जाऊ नका असे बजावले. त्यावरून वाद चारही जणंनी देविदास इंगळे व त्यांच्या पत्नीला मारहाण केली. कुर्रहाड आणि कुदळीने हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चारही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हेकॉ कलीम देशमुख करीत आहेत.