घरातच सुरू होता गंदा धंदा! चौघींना घेतले पोलिसांनी ताब्यात....! अंजनी बु येथे डोणगाव पोलिसांची कारवाई....

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील अंजनी बु येथे डोणगाव पोलिसांनी देहव्यापाराच्या धंद्याचा पर्दाफाश केला. घरातच हा गंदा धंदा सुरू होता.. याप्रकरणी पोलिसांनी चौघींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे...
अंजनी बु. येथे देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे  मेहकरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, लोणारचे ठाणेदार निमिष मेहेत्रे, मेहकरचे ठाणेदार आलेवार, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे आणि पोलिस पथकाने अंजनी बु येथे छापा टाकला. या छाप्यादरम्यान २९, ३१,५५ आणि २५ वर्षीय अशा चौघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघी स्वतःच्या घरात आर्थिक फायद्यासाठी देहव्यापार चालवत असल्याचे समाेरआले. पथकाने त्यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी  घटनास्थळावरून ९,६०० रुपयांची रोख रक्कम, ११,००० रुपयांचे मोबाइल, यूपीआय स्कॅनर असा एकूण २१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणारचे ठाणेदार निमिष मेहेत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डाेणगाव पेालीस करीत आहेत.