BREAKING मोताळा तालुक्यातील शेलापुरात ढिशक्यांव ढिशक्यांव! बंदुकीतून दोन गोळ्या सुसाट सुटल्या अन्...

 
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मोताळा तालुक्यातील शेलापूर गावात खळबळजनक प्रकार घडला आहे. बंदुकीचा परवाना मिळालेल्या एकाचा शुल्लक कारणावरून संताप अनावर झाला..एवढा की त्याचा हात कंबरेला लटकवलेल्या बंदुकीवर गेला..रागाच्या भरात त्याने डायरेक्ट फायरिंग केली..ढिशक्यांव ढिशक्यांव च्या आवाजाने अख्खे गाव हादरून गेले..
प्राप्त माहितीनुसार घटना आज,९ एप्रिलच्या सकाळी साडेदहा –अकराच्या सुमारास घडली. शेलापुरातील एका हॉटेलवर शुल्लक कारणावरून राडा झाला.. अनिल नामदेव चिम (५०) हा त्याच्या साथीदारांसोबत हॉटेलवर बसलेला असताना कोल्ड्रिंक बॉटल फेकण्यावरून वाद उद्भवला.. वाद वाढत गेला तसा माजी सैनिक असलेल्या गणेश नामदेव चिम याचा संताप अनावर झाला..त्याने थेट त्याच्या परवाना धारक बंदुकीतून दोन गोळ्या फायर केल्या..यावेळी एकच धुमाकूळ उडाला..घटनास्थळ बुलडाणा मलकापूर रस्त्यावरच असल्याने काही वेळ एकच खळबळ उडाली..
 घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात गणेश नामदेव चिम याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बोराखेडी पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे..