सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअपला अपघात; दोन ठार, १६ जखमी...
Mar 30, 2026, 08:39 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी जाणारे पिकअप वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर १६ जण जखमी झाल्याची घटना चिखली मार्गावरील नांद्रा धांडे फाट्याजवळ काल २९ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदपूर जिल्हा लातूर येथील भाविक सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान चिखली मेहकर रसत्यावरील नांद्रा धांडे फाट्याजवळ चालकाला डुलकी लागल्यामुळे पिकअप वाहन उलटून या भीषण अपघातात अरमान शरीफ बागवान (वय १६) व रिहान सैदुसाब बागवान (वय १७) हे दोघे जागीच ठार झाले. तर १६ भाविक जखमी झाले. जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारहार्थ दाखल केले असून त्यांचेवर उपचार सुरू आहे. अपघातानंतर सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील म्हस्के, पत्रकार समाधान पाटील म्हस्के, सुरशे साहेब, प्रवीण धांडे, सागर धांडे, विष्णू धांडे, संदीप लद्दड, दिलीप गुराळकर, गजानन धांडे, तुषार धांडे, आकाश गुराळकर, व नांद्रा धांडे, नागझरी गावातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढून अॅम्बुलन्समध्ये टाकण्यासाठी मदत केली. तसेच घटनेची माहिती मिळताच मेहकरचे ठाणेदार आलेवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.