संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या! चिखलीकरांचे तहसीलदारांना निवेदन; चिखली शहरात कडकडीत बंद...
Mar 11, 2025, 14:26 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या निषेधार्थ आज चिखली शहरात कडकडीत बंद पुकारला आहे. चिखलीतील सर्वपक्षीय नेत्यांनी शहराततून रॅली काढून कडकडीत बंद ठेवण्याचे आव्हन केले. शहरात सकाळपासून रस्त्यावरती शुकशुकाट दिसून येत आहे.
चिखली मध्ये आज कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर पणे हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय नेत्यांनी चिखली शहर बंदचे आवाहन केले होते.
या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व प्रतिष्ठाने सकाळपासूनच बंद आहेत. बाजार समिती देखील बंद आहे. बंद ला व्यवसायिक, व्यापारी, सामाजिक संघटनानी आणी नागरिकांनी बंदला पाठिंबा दर्शवीला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. चिखलीच्या तहसीलदारांना सर्वपक्षीय नेत्यांकडून निवेदन देण्यात आले.