CRIME STORY सिंदखेडराजाच्या संस्कृती काळे हत्याकांडात धक्कादायक खुलासा!अर्थव न सांगताच संस्कृतीला भेटायला गेला अन्..
कॅफेतील सीसीटीव्ही फुटेजही समोर; अल्पवयातील प्रेमाचा धक्कादायक शेवट; कानाखाली मारल्याचा राग...
Feb 28, 2026, 14:22 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा येथील संस्कृती काळे या तरुणीच्या हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. अकोल्यात शिकणाऱ्या संस्कृतीचा नाशिकजवळच्या एका जंगलात मृतदेह आढळला.. राज्यभरातील मिसिंग तपासल्यानंतर अकोल्यात मिसिंग दाखल असलेल्या संस्कृतीच्या कुटुंबीयांना नाशकात बोलवण्यात आले..त्यानंतर हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे त्यांनी सांगितले..दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी हा दुसरबीड चा अथर्व देशमुख आहे, त्याचे वय केवळ १९ वर्षाचे आहे. या प्रकरणात तपास दरम्यान पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत, ज्यातून वेगवेगळे खुलासे होत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अथर्व देशमुख आणि संस्कृती काळे यांच्या कुटुंबीयांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यानिमित्ताने दोन्ही कुटुंबीयांचे एकमेकांकडे जाणे येणे असायचे. यातूनच अर्थव आणि संस्कृतीची ओळख होऊन प्रेमसंबध निर्माण झाले. कुटुंबीयांना याबाबत माहिती झाल्यानंतर संस्कृतीला पुढील शिक्षणासाठी अकोला तर अर्थवला नाशिकला पाठवण्यात आले. मात्र तरीही दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होतेच.
अर्थव अकोल्याला जायचा..
महिन्यातून काही वेळेस अर्थव संस्कृतीला भेटण्यासाठी अकोल्याला जायचा.मात्र १९ फेब्रुवारीला तो तिला न सांगताच अकोल्याला पोहोचला. संस्कृती एका दुसऱ्या मुलाशी बोलत असल्याचे पाहिल्यानंतर तो संतापला. दरम्यान त्याच दिवशी सायंकाळी ५:५० वाजता संस्कृती अथर्व आणि अथर्व चे दोन मित्र अकोल्यातील एका कॅफेत संस्कृतीला भेटले. ५:५० ला कॅफेत प्रवेश केल्यानंतर जवळपास ते ६:४२ ला कॅफेतून बाहेर पडले.
चारित्र्यावर संशय अन कानाखाली मारल्याचा राग..
कॅफेतून बाहेर पडल्यानंतर एका डस्टर कार मधून चौघे पुढील प्रवासासाठी निघाले. यादरम्यानच संस्कृती आणि अर्थव यांच्यामध्ये चरित्राच्या संशयावरून खटके उडाले. अर्थवने संशय घेतल्याचा राग अनावर झाल्याने संस्कृतीने अर्थवच्या कानाखाली मारली..याचा राग आल्याने अर्थवने चाकूने संस्कृतीच्या मानेवर वार करून तिला संपवले..हा सगळ घटनाक्रम १९ फेब्रुवारीच्या रात्रीचा आहे. दरम्यान संस्कृती ठार झाल्याचे कळताच अर्थवचे दोन मित्र निघून गेले.त्यानंतर अर्थवने संस्कृतीचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील सारूळ येथील जंगल परिसरात संस्कृतीचा मृतदेह फेकून दिला.
इकडे संस्कृतीच्या कुटुंबीयांनी संस्कृती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. तिकडे अनोळखी तरुणीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आल्यानंतर घटनेची माहिती नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी राज्यभरातील बेपत्ता मुलींच्या माहितीवरून काही मुलींच्या पालकांना निरोप पाठविला. त्यात संस्कृती काळेचे कुटुंबीय देखील नाशकात पोहचले,त्यांनी हा मृतदेह संस्कृतीचाच असल्याची ओळख पटवली. अकोल्यात शिकणाऱ्या संस्कृतीचा मृतदेह नाशिक परिसरात आढळल्याने कुटुंबीयांनी पोलिसांकडे अर्थव देशमुख वर संशय व्यक्त केला. पोलिसांनी साफळा रचून नाशिकातून पुण्याकडे फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या अथर्वला अटक केली, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अथर्वणे खुनाची कबुली दिली.
खुनाची आधीच तयारी?
दरम्यान या प्रकरणात आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अर्थवने सांगितल्याप्रमाणे कानाखाली मारण्याचा राग, चरित्राचा संशय यावरून हा खून झाल्याचे समोर येत आहे. मात्र संस्कृतीचा खून करायचा हे ठरवूनच अर्थव अकोल्यात गेला होता का? या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत. कारण हा सगळ्या प्रकार कारमध्ये घडला, त्यावेळी आधीच अर्थवने चाकू का आणून ठेवला? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.