खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील गणेशपुर येथे एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षांनी एका प्रकरणाचा उलगडा झाला आहे..अनैतिक संबंधात आडवा आल्याने दोघांनी मिळून एकाचा खून केला होता..पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात पुरला होता, त्याची मोटारसायकल देखील एका नदीत फेकून दिली होती..झालं गेलं पार पडल..पोलीस आपल्याला शोधू शकले नाहीत या खुशीत दोन्ही आरोपी होते..मात्र तब्बल दोन वर्षांनी पोलिसांची झडप आरोपींवर पडली.. पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपींनी खुनाची कबुली दिली..त्यानंतर एका शेतात खोदकाम करून दोन वर्षापूर्वी पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला,त्याचा अक्षरशः सांगाडा पोलीसांच्या हाती लागला...एखाद्या हिंदी सिनेमातील कथानकासारखाच हा प्रकार....
गणेशपुर येथील नंदू श्रीराम धंदरे हे चिखली तालुक्यातील अमडापुर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लर्क होते. दोन वर्षांपूर्वी १८ ऑक्टोबर २०२२ पासून ते बेपत्ता होते. ते कुठे गेले,कसे गेले याबाबत कुटुंबियांना कोणतीही माहिती नव्हती..सगळीकडे शोधाशोध घेऊनही नंदू धंदरे कुटुंबीयांना सापडले नाहीत..त्यामुळे हिवरखेड पोलीस ठाण्यात नंदू धंदरे बेपत्ता झाल्याची तक्रार धंदरे कुटुंबीयांनी दिली.. सज्ञान व्यक्ती बेपत्ता झाल्यानंतर पोलीस फारसे गांभीर्याने घेत नाहीत, तोच प्रकार या प्रकरणात देखील झाला.. रागरागात कुठे गेले असतील, परत येतील असेच सर्वांना वाटत होते... मात्र कित्येक दिवस उलटून देखील नंदू धंदरे यांचा शोध लागत नव्हता..दिवसामागून दिवस जात होते आणि धंदरे कुटुंबियांच्या आशा देखील आता मावळत चालल्या होत्या..तब्बल दोन वर्षे धंदरे कुटुंबीय नंदू यांची वाट पाहत होते...
असा झाला उलगडा...
दरम्यान नंदू धंदरे यांच्या बेपत्ता प्रकरणाची एक कुजबुज पोलीसांच्या कानावर गेली होती.. धंदरे कुटुंबियांना देखील यात काहीतरी काळेबेरे झाल्याचा दाट संशय येऊ लागला होता..मात्र अधिकृत पुरावे नसल्याने पोलिसांचेही हात बांधले गेले होते..दरम्यान आठवडाभरापूर्वी एका शाळेत चोरी झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गणेशपुर येथील दिपक शालिकराम ठोके (२३) याला ताब्यात घेतले..पोलिसांना थोडा संशय असल्याने दिपक याची कसून चौकशी केली असता त्याने नंदू धंदरे हत्यांकांडाची कबुली दिली. या हत्याकांडात अतुल गंगाराम कोकरे (२८, रा. गणेशपूर) याचा सहभाग असल्याचे दिपकने पोलिसांना सांगितले..
अनैतिक संबंधात अडसर...
दिपकने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अतुल कोकरे याला देखील अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल कोकरे याचे गावातील एका महीलेशी अनैतिक संबंध होते. काही कारणास्तव नंदू धंदरे याच्यामुळे अतुलच्या संबंधाला नंदुमुळे अडथळा निर्माण होत होता..त्यामुळे नंदुचा काटा काढायचाच असा प्लॅन अतुल कोकरे याने केला.यासाठी अतुलने मित्र दिपक ठोके याची मदत घेतली. नंदू धंदरे हा अमडापुर वरून गणेशपुर कडे येत असताना अतुल आणि दिपक यांनी त्याला मारहाण केली.. फावड्याच्या दांड्याने तोंडावर - मानेवर - डोक्यावर मारहाण केल्याने नंदू धंदरे याचा मृत्यू झाला.पुरावे नष्ट करण्यासाठी अतुल आणि दिपकने अतूलच्या शेतातील धुऱ्यावर गड्डा करून नंदूचा मृतदेह त्यात पुरला..नंदुची मोटारसायकल मेहकर भागातील एका नदीत फेकून दिली..
सांगाडा बाहेर काढला...
दरम्यान हा सगळा घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले.. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास चौधरी यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार पोलिसांनी पंचासमक्ष अतुल कोकरे याच्या गणेशपुर - उदयनगर रस्त्यावर असलेल्या शेतातील धुऱ्यावर खोदकाम केले..दोन वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याकांडातील मानवी सांगाडा पोलीसांच्या हाती लागला..हा सांगाडा आता फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे..आरोपी अतुल आणि दीपक यांच्यावर तब्बल दोन वर्षांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...