फटाके फाेडण्यावरून साखळीत राडा; तिघांनी केली एकाला मारहाण; पाेलिसांनी केला गुन्हा दाखल; जीवे मारण्याचीही दिली धमकी !
Oct 22, 2025, 13:49 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : घरासमाेर फटाके फाेडू नका असे म्हणताच साखळी बु येथे तिघांनी एका मारहाण केल्याची घटना २१ ऑक्टाेबर राेजी घडली. या प्रकरणी पेालिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सय्यद इरफान सय्यद फैजान यांनी बुलढाणा ग्रामीण पाेलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी बहीण घरासमाेर २१ ऑक्टाेबर राेजी फिरत हाेती. यावेळी घराशेजारी राहणारे शाहीद शाह हमीद शाह, समीर शाहा हनीफ शाहा हे घरासमाेर फटाके फाेडत हाेते. त्यांना घरासमाेर फटाके फाेडू नका, असे माझे वडील सैय्यद फय्याज सैय्यद आमीर यांनी त्यांना म्हटले.
त्यावरून वाद घालून शाहीद शाह हमीद शाह, समीर शाहा हनीफ शाहा व त्यांचे वडील हनीफ शाह नसीर शाह यांनी विटकर माझ्या वडीलांना मारले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून बुलढाणा ग्रामीण पाेलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पेालीस करीत आहेत.