शॉक लागून चिमुकल्याचा मृत्यू; पाणी भरतांना मोटारीचा शॉक लागला; आंबेटाकळी गावात हळहळ.....
Feb 20, 2025, 12:12 IST
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पाणी भरतांना मोटारीचा शॉक लागल्याने ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी गावात ही घटना घडली. यामुळे गावात एकच शोककळा पसरली आहे..
आंबेटाकळी गावात नळ जोडणीचे काम सुरू होते. यावेळी लहाणे कुटुंबातील सदस्य घरात पाणी भरण्यासाठी मोटार चालवत होते. त्याचवेळी योगीराज सागर लहाणे (७) याला अचानक विजेचा धक्का लागला. या धक्क्याने त्याला गंभीर इजा झाली. त्याला तत्काळ खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे मृतक योगीराजच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.