चिखलीकरांनो "हे" चेहरे नीट पाहून घ्या! भंगार गल्लीत झाले मॅटर; पोलिसांनी मुसक्या आवळल्या.....

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील भंगार गल्लीत १३ ऑक्टोबरच्या सायंकाळी राडा झाला..काल नवदुर्गा विसर्जन बंदोबस्त असल्याने पोलीस बंदोबस्त करण्यात व्यस्त होते..त्याचा फायदा चार भामट्यांनी घेतला.. मुरादपुर येथील तुषार रघुनाथ साळोख (२१) या तरुणाला अंधारात एकटे पाहून चौघांनी बेदम मारहाण केली. मोबाईल हिसकला, आणि जीवाने मारण्याची धमकी दिली..घटनेनंतर तुषारने पोलिसांना माहिती दिली..पोलिसांनी तातडीने ॲक्शन घेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत...
  समीर खॉ इसार खा पठाण वय (२१) सलमान इरफान पठाण (२५) संदीप रामदास वावर व योगेश प्रकाश शिंदे सर्व रा. शेलसुर अशी आरोपींची नावे आहेत..तक्रारदार तुषार भंगार गल्लीतून मोटारसायकल लोटत घेऊन पेट्रोल पंपावर जात होता, त्यावेळी आरोपींनी तुषारला पकडले, त्याचा मोबाईल हिसकला, मारहाण केली जीवाने मारण्याची धमकी देत आरोपी पळून गेले..काही मीटर अंतरावर पोलिसांची गाडी दिसल्याने तुषार ने घडलेली घटना पोलिसांनी सांगितली..पोलिसांनी तातडीने पाठलाग करून चार पैकी दोन आरोपींना पकडले..
उर्वरित दोघांना बस स्थानक परिसरातून अटक केली.अटक अरोपीतांच्या ताब्यातून मोवाईल किंमती १०००० रुपयाचा जप्त करण्यात आला असुन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.