चारित्र्यावर संशय! महिलेविरोधात अपमानास्पद वक्तव्ये करून बदनामी; दोघांवर गुन्हा दाखल! खामगाव ची घटना
Jun 3, 2025, 10:59 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):एका महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याविरोधात समाजात बदनामीकारक वक्तव्ये करून अपप्रचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल चांदुरकर आणि शैलेश भोज (दोघेही रा. जलंब नाका, खामगाव) यांच्याशी पीडित महिलेची पूर्वीपासून ओळख होती. २९ मे रोजी सायंकाळी ७ वाजता, खामगावमधील एका खासगी दवाखान्यात आरोपींनी संबंधित महिलेविषयी आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्ये केली. त्यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत समाजात अपप्रचार केल्यामुळे महिलेची प्रतिमा मलिन झाली.
या वक्तव्यांमुळे महिलेच्या जातीविषयीही अवमानकारक टिप्पणी करण्यात आल्याने सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीडित महिलेने या संदर्भात खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.