शेगावमध्ये घरफोडीचा प्रयत्न उधळला; विद्यानगर परिसरातील घटनेने नागरिकांत खळबळ...

 

 

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) — शेगाव शहरातील खामगाव रोडवरील विद्यानगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न उधळल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विद्यानगरमधील कलामाई शाळेजवळ राहणारे कमलसिंग किरतसिंग परीहार हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान, त्यांच्या पत्नीने खालच्या घराच्या वाजण्याचा आवाज आला. त्यांनी खाली येऊन पाहिले असता त्यांना अज्ञात व्यक्ती घराचे कुलूप तोडताना दिसला. त्यांना बघताच चोरट्याने तेथून पळ काढला. त्याच्या सोबत असणाऱ्या एकाच स्थानिकांना पकडण्यात यश आले. ही माहिती त्यांनी पतीला दिल्यानंतर परीहार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शेगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, आरोपी शेख अहमद शेख समय (वय ३६, रा. आरास लेआउट, बुलडाणा) आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांनी परीहार यांच्या घरासमोरील खालच्या मजल्यावरील दरवाजाचे कुलूप तोडले. तसेच, शेजारी राहणाऱ्या देवलाल ढगे यांच्या घराचे कुलूप देखील तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास नापोकाँ निलेश गाडगे करीत आहेत. पोलिस तपासानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.