पातुर्डा बुद्रुक येथे घरफोडी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास; संग्रामपूर तालुक्यात चोरांचा उच्छाद; चोरटे सीसीटीव्हीत कैद !
Mar 3, 2026, 16:04 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या शांततेचा फायदा घेत एका बंद घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. २ मार्चच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पातुर्डा खुर्द येथील रहिवासी फिर्यादी शुभम विष्णू झाडोकार (वय २९) यांचे मोठे वडील अविनाश देवमन झाडोकार हे सध्या उपचारासाठी पुणे येथे गेले आहेत. पातुर्डा बुद्रुक येथील त्यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली. २ मार्च रोजी रात्री २.२२ ते २.३० वाजेदरम्यान एका मोटारसायकलवरून तीन अज्ञात इसम झाडोकार यांच्या घरासमोर आले. त्यांनी मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा शिताफीने कापून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून ३० हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे १२ ग्रॅम वजनाची जुनी सोन्याची पोत (किंमत अंदाजे ४० हजार रुपये) असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून ते पसार झाले.
चोरीची संपूर्ण घटना समोरील घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, रात्रीची वेळ आणि चोरट्यांनी घेतलेली खबरदारी यामुळे फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. तरीही पोलिसांनी फुटेजच्या आधारे चोरट्यांचा मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ५९/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३३१(४) (घरफोडी), कलम ३०५(अ) (चोरी) आणि कलम ३(५) (सामूहिक हेतूने केलेले कृत्य) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन सोनोने पुढील तपास करत आहेत.