मादणी येथे घरफोडी; ९२ ग्राम साेने, १६० ग्रॅम चांदी केली लंपास; अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल !
Sep 5, 2025, 10:48 IST
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवी मादणी येथे ३ सप्टेंबर च्या रात्री चाेरट्यांनी एका घरातून ९२ ग्राम साेने, १६० ग्राम चांदी असा ५५ हजार रुपयांचा एवज लंपास केला. या प्रकरणी शिवाजी शेषराव मेटांगळे यांनी पाेलिसात फिर्याद दिली आहे.
३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील दरवाज्याचे नट व स्कू कढी तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने कपाट उघडून लंपास केले. यात एकदानी नग ३ वजन ३० मि. झुमके जोड २ वजन २० ग्रॅम, बेल जोड ९ बजन ४ ग्रॅम, बाळ्या ४.५०० मि, पोथ ३० ग्रॅम, पेन्डॉल ३ ग्रॅम ता चांदीचे कडे १० ग्रॅम, बांदीचे बाजूबंद ४० प्रेम, जोडवे ३० ग्रॅम असे अंदाजे सोने व चांदीचे पोलीसांच्या अंदाजे जुन्या दरानुसार १००००० रुपये व नगदी ५५००० हजार रुपयाची चोरी झाल्याची घटना ४ सप्टेंबर च्या सकाळी उघडकीस आली. आपल्या घरी चोरी झाल्याची घटना घडल्याचे समजल्यानंतर फिर्यादी शिवाजी शेषराव मटांगळे यांनी डोणगाव पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळाल्यानंतर डोणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून श्वान पथक व फिगरप्रिंट विभागाच्या कर्मचान्यांरा माहिती देऊन तपास करण्यासाठी पाचरण केले व सदर घटनास्थळावरील हाताची ठसे घतली तरी अज्ञात आरोपी विरोधात विविध कलमाने गुन्हे दाखल करून पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे करीत आहेत.
यापूर्वीही झाला हाेता दराेड्याचा प्रयत्न
या अगोदर ही मादणी येथे चोरट्यानी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण कुत्रे भुकल्याने चोर पळून गेले होते. सध्या डोणगाव परीसरात अवैध वाहतूक तसेच अवैध धंदे यामध्ये वाढ दिसून येत आहे त्यामुळे पोलिसांनी रात्री अपरात्री सर्रासपणे सुरू असणाऱ्या हॉटेल तसेच अनोळखी ना अटकाव घालणे गरजेचे आहे एवढेच नव्हे तर गावात पोलीसांनी गस्त वाढविणे गरजेचे आहे.