मलकापुरात डॉक्टरच्या घरात भरदुपारी चोरी...

 
Fyjj
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे. अशातच काल भर दुपारी वैद्यकीय सेवा देणारे डॉ.प्रणव चोपडे यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला टाकून मुद्देमाल व सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्या. काल दुपारी याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
डॉ. प्रणव चोपडे नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता आपल्या राहत्या घरून वैद्यकीय सेवा देण्यासाठी दवाखान्यात गेले. द दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांच्या आईचा फोन आला आणि घरी चोरी झाल्याचे आईने त्यांना सांगितले.घरी कोणी नसताना चोरट्याने घराचे लॉक तोडून मुख्य दरवाजातून आत जाऊन बेडरूम मधील कपाटाचे लॉक तोडून सोन्याच्या चार अंगठ्या, आणि २५ हजार रोख असा ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३०५ (a) व 331 (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.