बंद घरावर चोरट्यांचा डल्ला..! ५ लाख १४ हजारांचे दागिने दामटले..! नांदुरा तालुक्यातील "येरळी" येथील घटना...

 
 नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांदुरा तालुक्यातील येरळी येथे चोरट्यांनी बंद घरावर डल्ला मारला. घरातून तब्बल ५ लाख १४ हजार रुपयांचे दागिने लंपास केले..या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..

 येरळी येथील आशिष ज्ञानेश्वर वेरुळकर यांनी नांदुऱ्यात घर बांधले आहे. त्यामुळे ते २ महिन्यांपासून नांदुऱ्यात राहतात. येरळी येथील त्यांचे घर बंदच होते. हीच संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी घर फोडून घरातील दागिने चोरून नेले. त्यात चपला हार, पाटल्या, कानातील दागिने, अंगठ्या, गोफ नेकलेस अशा दागिन्यांचा समावेश आहे. एकूण २०५ ग्रॅम वजनाचे दागिने किंमत अंदाजे ५ लाख १४ हजार रुपये चोरून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे..