

मोताळ्यात दादागिरी वाढली; तलवारी घेऊन आले अन् मोठमोठ्याने म्हणे, दुकान बंद करा...नेमकं काय झालं?
Mar 20, 2025, 13:28 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा शहरातील बसस्थानकासमोर हाती तलवारी आणि लाठ्याकाठ्या घेत दुकानांमध्ये घुसून तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. या टोळक्यामधील आठ आरोपींना बोराखेडी पोलिसांनी तब्यात घेतले आहे. आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोताळा बस स्टँड समोर लक्ष्मी किराणाच्या बाजूला असलेला चहाच्या दुकानासमोर हातात तलवारी व लाठ्या काठ्या घेऊन मोठमोठाने दुकान बंद करा असे म्हणून चहाचे हॉटेल समोरील खुर्च्या तोडून खुर्च्यांचे नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या ९ जणांना बोरखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेख साजीद उर्फ बाबा शेख सुपडु कुरेशी, आवेद शाह सरदार शाह, सुमीत मुंकदराव थाटे, शेख ईम्रान शेख लुकमान, जुनेद शाह गफार शाह सर्व रा. मोताळा, शेख दानीश शेख अकील रा. रोहीणखेड, आरीफ शाह उर्फ लाला मिस्कीन शाह रा. कोथळी, मो. शोएब मो. हनीद, शेख हारुन शेख हनिफ रा.बोराखेडी अशे दहशत माजवणारे आरोपींचे नाव आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंगेपल्लू करीत आहे.