दादागिरी! गाडी आडवी लावून म्हणे "आम्ही आमदाराचे माणसं.." आया –बहिणीला अश्लील शिवीगाळ! मुलाला मारले... "तुझ्याकडून काय होत ते करून घे म्हणे!" देऊळगावराजा तालुक्यातील घटना !

 
देऊळगावमही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "आम्ही आमदाराची माणसं आहोत" असे म्हणत दादागिरी करत तिघांनी अश्लील शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी  मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार सुरा येथील अक्षय रामचंद्र साळवे (२९) आई व बहिणीला फाट्याकडे मोटरसायकलवर घेऊन जात होता. त्यावेळी ३ आरोपी त्यांच्याजवळ आले त्यांनी मोटार सायकल आडवी लावली. त्यावर मोटार सायकल आडवी का लावली अशी विचारणा केली असता " आम्ही आमदाराची माणसं आहोत" असे बोलून त्यांनी अक्षय ची कॉलर धरून लोटपाट केली. अश्लील शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.. तुझ्याकडून काय होतं ते करून घे, आम्हीच तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून मेंडगाव येथील उमेश भानुदास खाडेरा, नागणगाव येथील संतोष विनायक मुंडे, खंडू विश्वनाथ मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.