बुलढाणा पोलिसांची अवैध धंद्यांवर धडक मोहीम! सात दिवसांत ४४३ आरोपींवर ४२५ गुन्हे दाखल; १२ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त....

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील अवैध दारू, वरली मटका, IPL सट्टा आणि इतर गैरकायदेशीर धंद्यांवर बुलडाणा पोलिसांनी धडक कार्यवाही सुरू ठेवली आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिल २०२५ या कालावधीत अवैध धंद्यांविरोधात ४४३ आरोपींना अद्दल घडवण्यात आली असून ४३५ गुन्हे दाखल करण्यात आले. 

 बुलडाणा पोलिसांच्या या मोहिमेमध्ये एकूण ₹१२ लाख १३ हजार ७७४ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ३३ पोलिस स्टेशनच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत अवैध धंद्यांना खतपाणी नाहीच असा इशाराच एसपी विश्व पानसरे यांनी या कारवाईच्या माध्यमातून दिला आहे. 
  जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली ही कामगिरी अपोअ श्री. श्रेणिक लोढा (खामगाव), अपोअ बी. बी. महामुनी (बुलढाणा), पोनि. अशोक एन. लांडे (स्थानीय गुन्हे शाखा), तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील, श्री. सुधीर पाटील, श्रीमती मनिषा कदम आणि सर्व पोलिस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेची विशेष पथके या मोहिमेत सक्रिय होती. विशेष मोहिमेमध्ये अवैध देशी-विदेशी दारू, गावठी हातभट्टी, विनापरवाना विक्री आणि जुगार/सट्टा यांच्यावर जोरदार कारवाई करण्यात आली.