

बुलडाणा लाइव्हचे भाकीत खरे ठरण्याच्या मार्गावर! दाभाडीतील डॉक्टर पत्नीच्या मर्डरचे मॅटर वेगळेच; तो दरोडा नव्हेच ? धक्कादायक कारण....
Jan 24, 2025, 08:36 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १९ जानेवारीला मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे पशुवैद्यकीय डॉ. टेकाळे यांच्या घरी "कथित दरोडा" प्रकरण घडून त्यात डॉ. टेकाळे यांच्या पत्नीचा जीव गेला होता. त्यानंतर २१ जानेवारीच्या एका वृत्तात "बुलडाणा लाइव्ह" ने दाभाडी दरोडा प्रकरणावर विविध प्रश्न उपस्थित केले होते. त्यात हे प्रकरण दरोड्याऐवजी वेगळीच कलाटणी घेऊ शकते, यात धक्कादायक खुलासा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. अखेर आता बुलडाणा लाइव्ह ने वर्तवलेला अंदाज खरा ठरण्याच्या मार्गावर असून पोलीस त्या निष्कर्षापर्यंत पोहचले आहेत.त्यावर केवळ अधिकृत शिक्कामोर्तब होणे बाकी आहे..
१९ जानेवारीच्या पहाटे मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे पशुवैद्यकीय डॉ. गजानन टेकाळे हे त्यांच्या घरात बेशुध्द अवस्थेत तर त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे या गतप्राण झालेल्या अवस्थेत शेजाऱ्यांना दिसल्या होत्या. घरातील कपाट आणि कपड्यांची अस्था व्यस्थता पाहून घरी दरोडा पडला असावा आणि दरोडेखोरांच्या झटापटीत माधुरी टेकाळे यांचा मृत्यू झाला असावा असे प्रथमदर्शनी पाहणारे सर्वजण सांगत होते. पोलिसांनी देखील त्या दिशेने तपासाला सुरुवात केली होती.एसपी विश्व पानसरे यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत स्थानिक गुन्हे शाखा व बोराखेडी पोलिसांना झटपट तपास करण्याचे निर्देश दिले. दरम्यान या प्रकरणात जखमी असल्यासारखे(?) वाटणारे डॉ.गजानन टेकाळे यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शी म्हणून तेच पोलिसांना अधिक माहिती देऊ शकत होते. मात्र शुद्धीवर आल्यावर देखील डॉ.टेकाळे यांच्याकडून पोलिसांना दरोड्याची(?) माहिती मिळाली नाही...
पोलिसांना लागला सुगावा..
दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने या प्रकाराचा तपास केला. आता पोलिसांचा संशय एका जवळच्या व्यक्तीवर गेला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले..तो एक हजार एक टक्के खरा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही तांत्रिक पुरावे देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता मोठा उलटफेर होणार आहे. त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब स्वतः एसपी विश्व पानसरे पत्रकार परिषद घेऊन करू शकतात...