बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबलची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! पोलीस दलात खळबळ...
Mar 9, 2026, 11:30 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील एका हेड कॉन्स्टेबलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेले ५६ वर्षीय पंजाबराव भीमराव शेळके यांनी साखरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील बाभूळखेड येथील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पंजाबराव शेळके हे सध्या बुलढाणा जिल्हा पोलीस दरात मुख्यालयात कार्यरत होते. दोन वर्षांनी ते सेवानिवृत्त होणार होते, मात्र त्याआधीच त्यांनी जीवन यात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही, मात्र या घटनेने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पंजाबराव शेळके यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.