बुलडाणा जिल्हा हादरला! १७ वर्षीय मुलीवर बलात्कार, व्हिडिओ काढले अन्....

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशात आणि राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची रोज नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशातच आता बुलडाणा जिल्ह्यात देखील एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला, त्याचे व्हिडिओ देखील नराधमाने काढले...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिडीत तरुणी नांदुरा तालुक्यातील असून १२ व्या वर्गात शिकते. अंकित गजानन गवई नावाच्या तरुणाने पिडीत मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.काही दिवसानंतर तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंधाचा आग्रह धरला. तरुणीने नकार दिला असता अंकितने मुलीवर जबरदस्ती बलात्कार केला. एवढ्यावर अंकित थांबला नाही तर त्याने त्या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण देखील केले..

  मुलीचे लग्न ठरल्यावर होणाऱ्या नवऱ्याला पाठवला व्हिडिओ...
  दरम्यान पिडीत तरुणीचे काही दिवसांपूर्वी लग्न ठरले. त्यावेळी अंकित तिला त्रास देऊ लागला. त्याने तिचे लग्न मोडण्यासाठी आधी काढलेला "सेक्स व्हिडिओ" तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवला..व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीचे लग्न मोडले..दरम्यान या त्रासाला कंटाळून अखेर नांदुरा पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने धाव घेतली असून तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अंकित गवई विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे...