जळगांव खान्देश च्या महाजनला बुलडाणा LCB चा "प्रसाद"! मलकापूरात केले होते कांड!नेमकं मॅटर काय? वाचा...

 
Karim
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा LCB नेहमीच अट्टल गुन्हेगारांचा शोध घेण्यात आघाडीवर असते. पोलीस निरीक्षक अशोक लांडेंच्या धमाकेदार नेतृत्वात बुलडाणा पोलीस दलाची मान उंचावणाऱ्या शेकडो कारवाया LCB ने केल्या आहेत. आता जबरी लुटमार करणाऱ्या एका आरोपीला जळगाव खान्देश मधून उचलले आहे. 
  मलकापूर शहर परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, बी.बी. महामुनी यांनी गुन्ह्याची उकल करुन, गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून, गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना आदेश केले होते. त्या अनुषंगाने पोनि अशोक लांडे त्यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, पोलीस अंमलदार गजानन माळी, गणेश पाटील, गजानन गोरले, विजय मुंढे यांनी ही कारवाई केली.
काय होते मॅटर? 
ऋतुजा श्रेयस व्यवहारे (रा. देशपांडे गल्ली) यांच्या स्कुटीचा पाठलाग करुन चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांची हिसकावून घेतल्याचा जबरी चोरीचा गुन्हा मलकापूर पोलिसांत दाखल होता. गुन्ह्याचा तांत्रीक तपास आणि गोपनीय माहिती काढून सदर गुन्ह्यात जळगाव खांदेश जिल्ह्यातून आरोपी प्रसाद ऊर्फ परेश संजय महाजन (वय २७ वर्षे) रा. जळगाव खांदेश याला आज ७ सप्टेंबर रोजी बेड्या ठोकल्या. त्यामुळे उपरोक्त गुन्ह्याची यशस्वी उकल झाली. तसेच उपरोक्त गुन्ह्यात आणखी एक आरोपी निष्पन्न केला असून गेलेला मुद्देमाल, गुन्ह्यातील वाहन आणि फरारी आरोपीचा शोध सुरु आहे. अटक आरोपीस मलकापूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.