BREAKING मेहकरात दंगल ! गाड्या पेटल्या दगडफेक झाली; एसडीओंनी लावली संचारबंदी; मेहकर शहराच्या सीमा सीलबंद.. कुणालाच मेहकर मध्ये जाता येणार नाही!

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, या निवडणुकीत उलटफेर होऊन महाविकास आघाडीचे सिद्धार्थ खरात विजयी झाले. दरम्यान काल,२४ नोव्हेंबरच्या रात्री दोन समुदायात दंगल झाली. काही गाड्या पेटवण्यात आल्या असून दगडफेकही झाल्याचे वृत्त आहे. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा देखील वापर करावा लागला. दरम्यान रात्रीपासूनच मेहकर शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या पत्राने संचारबंदीचे आदेश लागू झाले आहेत..काल रात्रीपासून संपूर्ण शहरात संचारबंदी लागू झाली आहे. मेहकर शहरात पोलिसांचा अतिरिक्त पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. मेहकर शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरच्या नागरिकांना शहरात प्रवेश करण्यास देखील मनाई करण्यात येत आहे..दरम्यान समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहेत..
 जाधव                    जाहिरात👆