BREAKING मलकापूर हादरले! मायलेकाने मिळून केला बापाचा मर्डर; बाथरूम मध्ये टाकला मृतदेह...

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापुरातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. मायलेकाने मिळून बापाचा मर्डर केला..मृतदेह घराच्या बाथरूम मध्ये टाकला.. पोलिसांनी आरोपी मायलेकांना ताब्यात घेतले आहे. तुळशीराम पठ्ठे (५०, रा. मलकापूर) असे मृतकाचे नाव असून निलेश तुळशीराम पठ्ठे (२४) व जया तुळशीराम पठ्ठे (४५) अशी आरोपी मायलेकांची नावे आहेत.

  पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतक तुळशीराम पठ्ठे हे माजी सैनिक होते. पत्नी जया पठ्ठे यांच्याशी त्यांचे कौटुंबिक वाद होते. त्यामुळे ते पत्नी सोबत राहत नव्हते..दरम्यान काल,२६ जूनच्या रात्री ते पत्नी व मुलाकडे आले..त्यांच्यात जोरदार वाद झाला..यावेळी मुलगा निलेश व पत्नी जया तुळशीराम पठ्ठे या दोघांनी मिळून तुळशीराम पठ्ठे यांचा खून केला...
रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह घराच्या बाथरूम मध्ये टाकून दोघे मायकेल फरार झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाचा वेगवान तपास केल्यानंतर मायलेकांनीच मिळून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने दोघा मायलेेकांना अटक केली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे...