

BREAKING अवैध रेती वाहतुकी वाल्यांचा वैताग सुरूच! पिंपळवाडीजवळ टिप्परने दोघांना उडवले; महसूल यंत्रणा स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त; खोटं बोलतांना लाजही वाटत नाही...
अवैध रेती वाहतूक बंद असल्याची खोटी आवई वारंवार महसूल यंत्रणेकडून उठवली जाते. भर दिवसा आणि वर्दळीच्या रस्त्यावरून शेकडोंच्या संख्येत टिप्पर धावतात.. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील ते कैद होते..एवढा ढळढळीत पुरावा असताना खोटं बोलताना यंत्रणेला लाज देखील वाटत नाही. काल, सायंकाळी सुभाष खरात आणि संतोष साळवे चिखली वरून गावाकडे निघाले होते.
त्याचवेळी पिंपळवाडी ते मिसाळवाडी दरम्यान समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. सायंकाळी ६:५० ला हा अपघात झाला. विशेष म्हणजे अपघाताच्या काही मिनिटे आधी शेळगाव आटोळ येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेतीने भरलेले चार टिप्पर चिखली कडे जाताना दिसत आहेत. तरीही संबंधित यंत्रणा म्हणेल हा अपघात टिप्पणी झालेला नाही, कारण खोटं बोलताना त्यांना लाजच वाटत नाही..दरम्यान दोन्ही तरुणांवर चिखली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इसरूळ येथील सतीश भुतेकर यांनी तहसील आणि पोलीस प्रशासनाला संबंधित घटनेची माहिती दिली आहे...