BREAKING बुलडाणा जिल्हा हादरला! ६० वर्षाच्या नराधमाचा ९ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार....

 
 शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका विकृत नराधमाने ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे..या घटनेमुळे जनमानासातून संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहेत..या घटनेतील आरोपी हा ६० वर्षांचा आहे...
शेगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. चिमुकलीच्या ३७ वर्षीय आईने पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली आहे.तक्रारीनुसार पैशांचे प्रलोभन दाखवून आरोपीने चिमुकलीला घरात नेले..तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला..त्यानंतर "तुला मी पैसे देईल, ही गोष्ट कोणाला सांगू नको..ही गोष्ट कोणाला सांगितली तर तर तुला मारून टाकीन" अशी धमकी आरोपीने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर चिमुकलीने तिच्या आईला या प्रकाराबद्दल सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे.. पोलिसांनी आरोपी माणिकराव दामोदर याच्या विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे...