ब्रेकिंग... काळया काळजाचा बाप! दोन जुळ्या बहिणांचा मर्डर; सख्या बापानेच केला घात; अंढेरा शिवारातील घटना....कुजलेले मृतदेह सापडले...
Updated: Oct 25, 2025, 14:39 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत धक्कादायक घटना समोर आली आहे. अंढेरा ते अंचरवाडी दरम्यान असलेल्या जंगलात दोन जुळ्या मुलींचे कुजलेले मृतदेह सापडले आहेत. सख्या बापानेच दोन चिमुकल्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे...
सध्या घटनास्थळी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे. आरोपी बाप हा वाशिम जिल्ह्यातील राहणारा असून स्वतः तिथल्या पोलीस ठाण्यात जाऊन त्याने गुन्हा कबुल केला..त्यानंतर
अंढेरा पोलिसांनी शोध मोहीम राबवल्यानंतर दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले आहेत..
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार घटना २१ ऑक्टोबरची आहे. आरोपी बाप राहुल शेषराव चव्हाण (३३, रा. रोही, ता.मानोरा, जिल्हा वाशिम) हा पुण्यावरून गावाकडे जात होता. त्याआधीच त्याची पत्नी माहेरी गेलेली होती.. दरम्यान पत्नीशी झालेल्या वादाचा राग त्यांने अडीच वर्षांच्या दोन मुलींवर काढला. मुलींना जंगलात नेऊन धारदार शस्त्राने मारून टाकली. त्यानंतर आज त्याने गुन्ह्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत..
