बॉयफ्रेंड सोबत बिर्याणी खातांना हाड घशात अडकलं! तरुणीने तडफडत जीव सोडला...

 

 (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) दोघांचे एकमेकांवर जिवापाड प्रेम..ती प्रियकरासोबत वेळ घालवण्यासाठी एका हॉटेलवर गेली..तिथे त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली..मात्र ती खातांना मटणाच्या हाडाचा तुकडा तरुणीच्या घशात अडकला.. तिला श्वास घ्यायला भयंकर त्रास होऊ लागला..तडफडत असलेल्या गर्लफ्रेंडला प्रियकराने तातडीने हॉस्पिटल मध्ये नेल मात्र हॉस्पिटल मध्ये पोहोचण्या आधीच तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. पालघर मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे....

    पोलिसांनी माहिती दिली की तरुणी २७ तर तरुण २९ वर्षांचा होता. दोघेही शहरातील एका हॉटेलवर गेले होते. मटण बिर्याणी खात असताना एका हाडाचा लहान तुकडा तरुणीच्या घशात अडकला. तिला खोकला येऊ लागला, तरुणान तिला पाणी दिलं पण काही उपयोग झाला नाही..तिचा त्रास आणखी वाढत गेला..
  श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने ती तडफडायला लागली. त्यानंतर तरुणी बेशुद्ध पडली..तरुणाने तिला तातडीने जवळ्याच्या रुग्णालयात दाखल केलं,मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिस रुग्णालयात पोहचले, दुसरीकडे मुलीकडच्या मंडळींनी मुलावर आरोप केले आहेत. फसवून मुलीला मारल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. सध्या पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे....