ओलांडेश्वर संस्थान जवळून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला! पैनगंगेवर तरंगला मृतदेह; दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरवले....
Sep 14, 2024, 10:59 IST
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातील दुध्याच्या ओलांडेश्वर संस्थान जवळून एक तरुण काल,१३ सप्टेंबरला पैनगंगेत वाहून गेला होता. आज,१४ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजता त्याचा मृतदेह घटनास्थळापासून २०० मीटर अंतरावर सापडला आहे.
रविंद्र नन्हई (३५) हा युवक काल दर्शनासाठी ओलांडेश्वर संस्थान येथे आला होता. अंघोळीसाठी पाण्यात उतरताना पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला. कालपासूनच महसूल विभागाच्या वतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. बुलडाणा येथील शोधपथक देखील त्यासाठी ओलांडेश्वर संस्थान येथे पोहोचले होते. मात्र रात्री अंधार झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. दरम्यान आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. थोड्या वेळापूर्वी वाहून गेल्याच्या २०० मीटर अंतरावर रवींद्र चा मृतदेह सापडला.
रविंद्र हा शिर्डी येथील साईबाबा संस्थान मध्ये हॉस्पिटल विभागात नोकरीला होता. गौरी गणपतीच्या सणा निमित्ताने तो मूळ गावी साखरखेर्डा येथे आला होता. काल, कुटुंबासह ओलांडेश्वर संस्थान येथे दर्शनासाठी आलेला असताना पाय घसरून पडल्याने तो पैनगंगेत वाहून गेला होता. त्याच्या पश्चात पत्नी , एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
या पथकाने घेतला शोध...
मृतदेह शोधण्यासाठी अनंत साळवे महसूल सहायक ,कृष्णा जाधव, तरासिंग पवार पो. उप.संदीप पाटिल,पो. का.संतोष साबळे,पो. का सलिम बर्डे, पो.का.श्रीकांत गाढे ,गुलाब सिंग राजपूत पो.का.,अमोल वानी पो.का.सोनुने, पो.का.
कुरेशी, तलाठी राहुल मोहिते, परमेश्वर रहाटे, राहुळकर, नायब तहसीलदार,पंजाब खोकले ,मंडळ अधिकारी सुभाष मिटकरी यांनी परिश्रम घेतले.