सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांचे आवाहन!
२० ऑक्टोबर २०२६ रोजी रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सैलानी बाबा दर्गा परिसरात ही महिला मृतावस्थेत आढळून आली. महिलेचे वय अंदाजे ६५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी तसेच महिलेच्या जवळील वस्तूंची पाहणी केली असता, ‘लिलावती मुंडे’ हे नाव नमूद असलेली दवाखान्याची चिठ्ठी आणि एक फोटो आढळून आला. मात्र, या माहितीच्या आधारे अद्याप महिलेची निश्चित ओळख पटलेली नाही.
नातेवाइकांची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधा!
मृत महिला आपल्या गावातील, परिसरातील किंवा परिचयातील असल्यास नागरिकांनी तिच्या नातेवाइकांबाबतची माहिती रायपूर पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महिलेची ओळख पटविण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचेही पोलिसांनी आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे आणि पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी करीत आहेत.
माहिती असल्यास येथे संपर्क साधा
पोलीस ठाणे रायपूर : ०७२६२-२७००३०
पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे : ८४२१६१३३८२
पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी : ९३७०९६१९६२ मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रायपूर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.