BREAKING मलकापुरात रक्ताचा सडा! किन्नराचा खून; जिल्हा पोलीस घटनास्थळी! कारण काय?

 

 मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका किन्नराचा धरणगाव परिसरात मर्डर झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांसह एलसीबीचे प्रमुख अशोक लांडे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत..

प्राप्त माहितीनुसार मलकापुर धुपेश्वर दरम्यान धरणगावजवळ हायवेच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या एका शेतात एका किन्नराचा मृतदेह आज सकाळी आढळला. किन्नराच्या डोक्यावर मानेवर मारहाणीच्या खुणा आहेत, रक्ताचे ओघळ आहेत. हा खून कुणी केला? कोणत्या कारणामुळे केला याबाबतचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे...