BREAKING धोत्रा नाईक येथे पडला रक्ताचा सडा! बापाने दारू पिऊन आईला मारहाण केली म्हणून अल्पवयीन मुलाने बापाचा मर्डर केला...!

 
 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धोत्रा नाईक येथे आज मुलाने बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारू पिऊन बापाने आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने बापाच्या डोक्यात दगड घालून केला.. सुरेश रमेश भांडवले (४३) असे मृतक बापाचे नाव आहे..
प्राप्त माहितीनुसार मृतक सुरेश भांडवले यांचा अल्पवयीन मुलगा सैलानी येथे यात्रेनिमित्त कामाला गेला होता. आज दुपारी मुलाच्या आईने मुलाला रडत रडत कॉल केला.. "तुझा बाप दोन दिवसांपासून मारत आहे तू लवकर ये.." असे आईने मुलाला सांगितले. हे ऐकताच रागाच्या भागात हातातील काम सोडून मुलगा गावी धोत्रा नाईक येथे आला.. त्याने वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र दारूच्या नशेत त्यांनी पुन्हा बायकोला मारायला सुरुवात केला.. बाप आपल्या आईला बेदम मारहाण करत आहे हे बघताच मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात बापाच्या डोक्यात दगड घालून ठार केले. अमडापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.