मोठी बातमी..! अंढेऱ्यात अफूची शेती! साडेबारा कोटीचा माल जप्त; अंढेरा पोलिसांना खबरही नाही; LCB ने टाकली धाड....

 
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खरे तर अंढेरा येथे पोलीस स्टेशन आहे.. मात्र पोलिसांना कुठलीही कानकून नाही.. ना कुठली खबर...डायरेक्ट ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बुलढाणा मुख्यालयातील LCB ला खबर मिळते अन् टीम LCB जेव्हा धाड टाकते तेव्हा पोलीसही चक्रावतात होतात...होय कारणही तसेच आहे.. कारणअंढेरा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात तब्बल साडेबारा कोटींची अफू जप्त करण्यात आली आहे.. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.. विशेष म्हणजे ज्या शेतात ही कारवाई करण्यात आली ते शेत अंढेरा पोलीस स्टेशन पासून अवघ्या ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे..LCB ने केलेल्या या कारवाईमुळे अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे...
  अंढेरा शिवारातील संतोष मधुकर सानप (४९) याने त्याच्या शेतात अफूची शेती केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी पोलीस पथकासह रात्री छापा मारला...स्थानिक अंढेरा पोलिसांनाही सोबत घेण्यात आले.. आरोपीच्या ताब्यातून १५ क्विंटल ७२ किलो अफू ताब्यात घेण्यात आली.ज्याची बाजारभावाने किंमत १२ कोटी ६० लाख रुपये एवढी होते.. आरोपीवर अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..
अफू आणली कुठून?. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता...
जिल्ह्यात आतापर्यंत गांजाची शेती काही ठिकाणी करण्यात येत होती. मात्र आता थेट अफूची ची शेती करतांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने अफूची रोपे किंवा बियाणे कुठून आणले? त्याच्याकडून तो माल कोण विकत घेणार होता? असे विविध प्रश्न आता पोलिसांना पडलेले आहेत..त्यामुळे या साखळीतून अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात येऊ शकतात...