मोठी बातमी! उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर विरुद्ध गुन्हा दाखल! राष्ट्रध्वज उलटा फडकवला...समजावणाऱ्याला केली दमदाटी?

 
 अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उदयनगरचे सरपंच मनोज लाऊडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज नियमानुसार न फडकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काल, १४ मे रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

मनोज लाहुडकर उदयनगरचे सरपंच असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत. महाराष्ट्र दिनी उदयनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज नियमानुसार न फडकवता हिरवा रंग वर आणि केशरी पत्ता खाली अशा पद्धतीने उलटा फडकवला. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देखील दिली नसल्याने तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय समजावण्यासाठी गेलेल्यांना देखील दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बोरगाव काकडे येथील सतीश रामेश्वर काकडे (३४) यांनी या प्रकरणाची तक्रार दिली आहे. राष्ट्रध्वज अपमान प्रतिबंधक अधिनियम १७१ नुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.ठाकूर करीत आहेत..