मोठी बातमी! लोणारच्या ५ जणांचे मोठे कांड; "काळ्या जादुसाठी"पांढऱ्या कारमध्ये घेऊन गेले १० लाख रुपयांचा "हा" साप! छत्रपती संभाजीनगरात गेल्यावर....

 
 लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काळ्या जादूसाठी मांडुळ नावाच्या सापाची तस्करी करणाऱ्या ५ जणांचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पाचही आरोपी लोणारचे आहेत..लोणारवरून मांडूळ जातीचा ४ किलो वजनाचा साप घेऊन पाचही जण कारने छत्रपती संभाजी नगर कडे निघाले होते. चिकलठाणा विमानतळा समोर पोलिसांनी कारला अडवल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला..
  रामभाऊ नारायण अंभोरे (४२), संतोष बाबुराव कोकाटे(२१), राजू विठ्ठल इंगोले (४०) रवींद्र बाबाराव कलसारे (२६) कन्हैयालाल बद्रीलाल जानवा (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार आरोपी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये मांडुळ जातीचा साप घेऊन छत्रपती संभाजीनगर कडे जात होते. गोपनीय सूत्रांनी तशी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी चिकलठाणा विमानतळा जवळ सापळा रचला. मात्र पोलीस दिसतात आरोपींनी गाडी सुसाट वेगाने चालवली. पोलिसांनी पाठलाग करून गाडी अडवली, तपासणीनंतर गाडीत एका पिशवीत मातीत ठेवलेला ४ किलो वजनाचा मांडुळ जातीचा साप आढळून आला. पोलिसांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून साप वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला. 
आरोपींच्या चौकशीत सदर साप काळ्या जादू करणाऱ्यांना विकण्यासाठी घेऊन जात असल्याचे समोर आले. आरोपींचे मोबाईल जप्त केले असता त्यात विविध मांडूळ जातीच्या सापांचे फोटो दिसले. काही फोटो काळी जादू करणाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवले असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सापाची तस्करी करणारी ही टोळी अनेक दिवसांपासून असले उद्योग करीत असावे असा संशय पोलिसांना आहे. लोणार मध्ये वनसंपदा आणि जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे.. लोणार वरुनच आरोपी सापांची तस्करी करीत असावेत असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे...