

BIG BREAKING पुन्हा एकदा एका पोलिसाचा मर्डर? बुलढाणा जिल्हा हादरला....! गाडीमध्ये सापडला मृतदेह
Mar 30, 2025, 13:40 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २३ मार्चला अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील भागवत गीरी नामक पोलीस कर्मचाऱ्यांच्या खुनाची बातमी ताजी असतानाच आता देऊळगाव राजा तालुक्यातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आज, ३० मार्चला त्याच्याच मालकीच्या स्विफ्ट डिझायर वाहनात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (३८, गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर म्हस्के जालना हायवे पोलिस दलात कार्यरत होते..
प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा सिंदखेडराजा रोडवरील आरजे इंटरनॅशनल स्कूल समोरील वनविभागाच्या जागेत म्हस्के यांची स्विफ्ट गाडी आढळून आली. या गाडीत त्यांचा मृतदेह आढळला आहे..गाडी लॉक आहे.. गळा आवळून घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे, मात्र याबाबत अधिकृत स्पष्टीकरण पोलीसच करतील.स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पुढील तपास सुरू आहे