BIG BREAKING झालं बॉ....! ५ तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर आ.गायकवाड यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल; ...तर आमदार गायकवाड यांच्या अडचणी वाढू शकतात...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज दिवसभरापासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात वादंग सुरू आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. दरम्यान दुपारी अडीच वाजेपासून मध्य प्रदेशातून आलेले काँग्रेसचे निरीक्षक आ.चौधरी,जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आ. धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. तोपर्यंत संजय गायकवाड यांच्या विरोधात उन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत माघार न घेण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. आधी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हती, आम्ही पोलीस ठाण्यातच अन्न त्याग आंदोलन सुरू करतो असा इशारा पक्ष निरीक्षक आ.चौधरी यांनी दिला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी आ. गायकवाड यांचे विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला. अखेर रत्री उशिरा एफआयआर हाती आल्यानंतरच काँग्रेसने ठिय्या आंदोलन मागे घेतले. 
आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.गायकवाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १९२,३५१(२ ),३५२(३),३५२(४) लावण्यात आले आहे. या कलमानुसार गुन्ह्यात आरोप सिद्ध झाल्यास आमदार गायकवाड यांना एक वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो असे कायदे तज्ञांनी बुलढाणा लाइव्हला सांगितले.