BIG BREAKING जिल्हा हादरला..! पुन्हा एक मर्डर; रताळीत खून...३ दिवसापासून होते गायब

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अलीकडच्या काळात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. आज,५ एप्रिलच्या सकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एका खुनाची घटना उघडकीस आली आहे. रताळी येथे श्री. गायकवाड यांच्या शेतातील विद्युत रोहित्राजवळ एक प्रेत आढळून आले. प्रेतावर मारहाणीच्या खुणा असल्याने हा खून असल्याच्या निष्कर्षा प्रत पोलीस पोहोचले आहेत. नारायण भाऊराव मैंद (५०, रा. रताळी, मूळ राहणार , येवता ता.चिखली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे..
Pawar

 Advt 👆

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण भाऊराव मैंद हे मूळचे चिखली तालुक्यातील येवता गावचे रहिवासी होते. मात्र स्थानिक वादातून दोन वर्षांपूर्वी गाव सोडून ते सासुरवाडी असलेल्या रताळीत कुटुंबासह राहत होते. गेल्या ३ दिवसांपासून ते गायब होते.. कुटुंबीयांनी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दरम्यान आज सकाळी श्री.गायकवाड यांच्या शेतातील रोहित्राजवळ नारायण मैंद यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी साखरखेर्डा पोलिसांनी धाव घेतली. नारायण मैंद यांच्या डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा आहेत. त्यामुळे हा खूनच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिंदखेडराजा येथे पाठवण्यात आला आहे. काही संशयीतांची नावे देखील पोलिसांना प्राप्त झाली असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासला वेग दिला आहे..