

BIG BREAKING जिल्हा हादरला! एकाच रात्री दोन मर्डर! मंगरूळ नवघरे गावात चुलत भावाने घेतला भावाचा बळी; अमडापुरातही शेतीच्या वादावरून खून...
Apr 17, 2025, 15:29 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्हा दोन खुनाच्या घटनांनी हादरला आहे. कालच बुलढाणा लाइव्ह ने जिल्ह्यात घडतोय रक्तपात अशा मथळ्याखाली वृत्त छापत जिल्ह्यात ३ महिन्यात १८ खून झाल्याचे सांगितले होते. आता या आकड्यात आणखी २ ने वाढ झाली आहे. चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच रात्री दोन खुनाच्या घटना घडल्या. आज,१७ एप्रिलच्या सकाळी या घटना उजेडात आल्या आहेत. एक घटना मंगरूळ नवघरे येथील असून दुसरी घटना अमडापूर येथील आहे.
मंगरूळ नवघरे येथे चुलत भावाने चुलत भावाचा खून केला. घरात घुसून बाजेच्या ठाव्याने मारहाण करून भावाला संपवले. अमोल दिगंबर मगर (३३, रा. मंगरूळ नवघरे, ता.चिखली) असे मृतकाचे नाव आहे तर पंकज राजेंद्र मगर (३५) असे आरोपीचे नाव असून त्याला अमडापूर पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे अमडापुरात शेतीच्या वादातून भावकीत जुना वाद होता. या वादातून संजय गुलाबराव जाधव (४२, रा. अमडापूर) यांचा आरोपी अमोल जाधव याने धारदार शस्त्राने खून केला. आज सकाळी ही घटना उजेडात आली.घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी मृतकाच्या पत्नी कविताबाई जाधव अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचल्या आहेत. संजय जाधव यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शेतीच्या वादातून हा खून झाल्याचे समजते.. या दोन्ही घटनांनी जिल्हा हादरला आहे..