

BIG BREAKING देऊळगावराजा पोलिस खून प्रकरणातील आरोपी सापडला; जवळच्या मित्रानेच केली गद्दारी? खुनाचे कारण धक्कादायक...
"बुलडाणा लाइव्ह" ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा मृतक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या अतिशय जवळचा मित्र आहे. विशेष म्हणजे तो ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या भावकीतील असून राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याचे सूत्रांनी सांगितले. हा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याने खुनाची कबुली देखील दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले..या प्रकरणात मुख्य आरोपीसह एकूण ३ आरोपी प्रत्यक्ष घटनास्थळी होते. २ आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसले तरी पुढच्या काही तासांत ते पोलिसांच्या गळाला लागतील अशी शक्यता आहे. याशिवाय आणखी एखाद्या आरोपीचा खुनाचा कट रचण्यात अप्रत्यक्ष सहभाग असण्याची देखील शक्यता आहे.
मैत्रीत गद्दारी...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के आणि संशयित ४२ वर्षीय आरोपी चांगले दोस्त होते. या दोस्तीचा गैरफायदा घेत आरोपीने ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या कुटुंबातच "घरोब्याचे संबंध" निर्माण केले. या संबंधात अडसर ठरत असल्यानेच "त्या" गद्दार दोस्ताने ज्ञानेश्वर म्हस्के यांचा ३ साथीदारांसह खून केल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासाच्या कारणास्तव पोलिसांकडून अधिकृतरित्या याबद्दल माहिती देण्यात आली नसली तरी उद्यापर्यंत पोलीस याबद्दल अधिकृत माहिती प्रसिद्धीला देऊ शकतात..मात्र काहीही असले तरी या क्लिष्ट प्रकरणाचा वेगवान तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा,देऊळगाव राजा पोलिसांना सॅल्युट केलाच पाहिजे...