BIG BREAKING!जिल्ह्यात पुन्हा रक्तपात;जन्मदात्या बापाला मुलाने संपवलं!खामगाव तालुक्यातील घटना..
Apr 30, 2025, 10:08 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यात खुनाचे सत्र थांबायचे नाव घेतच नाही..जन्मदात्या बापाला पोटच्या मुलाने संपवल्याची घटना आज पहाटे खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे उघडकीस आली आहे.
खामगाव तालुक्यातील लोणी गुरव येथे आज,३० एप्रिलच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतक गोरख हिवराळे यांच्या अंगावर असलेल्या घावावरून प्रथमदर्शी निर्घुण खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.पोटच्या मुलानेच बापाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खामगाव तालुक्यातील मूळ बोथाकाजी येथील रहिवाशी गोरख हिवराळे हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या सासरी लोणी गुरव येथे राहत होते.

याच दरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह बोथाकाजी येथे त्याच्या घरात आढळला. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत. खुनाचे नेमके काय कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांची विचारपूस केल्याची माहिती मिळत आहे...