विश्वासघात! प्रेमातून सहमतीने शारीरिक संबंध! पण गुपचूप व्हिडिओ काढून व्हायरल केले! ती म्हणाली...धोका! मलकापूरची घटना..तरुणाला अटक होताच वडिलांचे निधन!
Jun 6, 2026, 11:08 IST
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तिने त्याला तीच सर्वस्व अर्पण केलं होतं..प्रेमच होत तसं..त्या प्रेमातून सगळं काही झालं... शारीरिक संबंध ही व्हायचे..मात्र त्याच्याआड दुसर काही चालू आहे, हे तिला माहितीच नव्हत..जेव्हा माहित झालं , तोपर्यंत व्हिडिओ व्हायरल होऊन बोभाटा झाला होता..
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीचे नाव अविनाश रोहिदास धामोणे (२६, रा. रोहिदास नगर मलकापूर) असे आहे. पीडित तरुणी २५ वर्षांची आहे. दोघांचे प्रेम संबंध होते..त्या प्रेम संबंधातूनच त्यांच्या भेटी गाठी वाढल्या होत्या.२९ मार्च २०२६ ते २१ मे २०२६ या काळात त्यांच्यात वेळोवेळी सहमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
तिने त्याला तिचे सर्वस्व देऊन टाकले होते. मात्र या खाजगी क्षणांचे आरोपी अविनाशने व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर व्हाट्सअप वर प्रसारित केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.. पीडित तरुणीने पोलीस ठाणे गाठल्याची कुणकुण लागताच आरोपी अविनाश फरार झाला होता..
अटक झाल्यानंतर वडिलांचा मृत्यू..
दरम्यान ४ जून रोजी पोलिसांनी अविनाशला अटक केली. ५ जून रोजी त्याला मोताळा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ८ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान अविनाश ला अटक होताच त्याच्या वडिलांचे देखील निधन झाले. वकिलांनी न्यायालयामध्ये अंतिम संस्कारा करता हजर राहण्याची परवानगी मागितली होती, पोलिसांनी देखील त्याबाबत नकार न दिल्याने अविनाश ला अंतिम संस्कारासाठी हजर राहण्याची परवानगी देण्यात आली. काल, मलकापूर येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत पोलिसांच्या उपस्थितीत त्याला हजर करीत त्याच्या वडिलांवर अंतिम संस्कार करण्यात आले...