आव्हा ते पोफळी रस्ता ठरतोय जीवघेणा..! ठेकेदाराच्या हलगर्जीपणा मुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान

 
 मोताळा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) आव्हा ते पोफळी कोल्ही गवळी रस्त्याची कित्येक दिवसापासून दुरावस्था आहे.कित्येकवेळा निवेदन देऊन सुद्धा समंधीत ठेकेदार अर्धवट राहिलेलं काम करण्यास तयार नाही त्यामुळे ठेकेदाराला कोणी पाठीशी तर घालत नाही ना ? हा प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.....
आव्हा ते कोल्ही गवळी एका गाडीचे चाक आत गेल्याने एस.टी.बस सह अनेक वाहनांची ट्रॅाफीक जाम झाली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही पण पुढील काळात रस्ता अपघाताला निमंत्रण देतांना दिसतो. त्यामुळे हे काम तात्काळ मार्गी लावावं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे..

अनेक वेळा रस्त्यावर आंदोलन करुन निवेदनं देऊन सुद्धा समंधीत रस्त्याची दुरुस्ती होत नसेल तर भर रस्त्यात मंडप टाकून विद्यार्थांसह उपोषनाला बसु याची प्रशासनाने नोंद घ्यावी. ठेकेदाराला कित्येक वेळा मागणी करुन देखील आव्हा पोफळी कोल्हीगवळी रस्ता अपूर्ण सोडलेला आहे हा रस्ता तात्काळ मार्गी लावा अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषनास बसावे लागेल 

शुभम घोंगटे
 युवासेना उप जिल्हा प्रमुख
कित्येक वेळा ठेकेदाराला सांगून सुद्धा तो कानाडोळा करत आहे.अशा ठेकेदारांना ब्लॅक लिष्ट करुन ताबडतोब चांगल्या ठेकेदाराला काम देऊन काम पूर्ण करा.अन्यथा झालेल्या अपघाताला समंधीत ठेकेदार जबाबदार राहील.
शिवाजीराव बोराडे
सरपंच कोल्ही गवळी