प्रेमासाठी काही पण..! प्रेम विवाहाला विरोध झाला; तरुणीने टोकाचा निर्णय घेतला; शौचालयातच...! खामगाव तालुक्यातील घटना

 
 खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): प्रेम विवाहाला विरोध झाल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खामगाव तालुक्यातील हिंगणा कोरेगाव येथे ही घटना घडली. शिवानी सतीश शिरसाट (२४) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे .
शिवानी खामगाव तालुक्यातील रामनगर येथील राहणारी होती. गावातीलच एका तरुणासोबत शिवानीचे प्रेमसंबंध होते. परंतु विवाहाला कौटुंबिक विरोध होता. नातेवाईकांनी शिवानीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. प्रियकरापासून ती दूर व्हावी म्हणून शिवानीला मामाच्या गावी हिंगणा कारेगाव येथे पाठवले होते. तिथे ती निराश राहत होती. त्यातच तिने मामाच्या घरातच शौचालयात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणाची तक्रार शिवानीच्या मामांनी पोलिस ठाण्यात दिली आहे...