संतापजनक.! अल्पवयीन मुलाला खेळायला मोबाईल दिला अन् अनैसर्गिक बलात्कार केला!देऊळगाव राजा हादरले; आरोपी मातल्याचा सुरडकर....

 
 देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा शहरातून चीड आणणारी संतापजनक बातमी समोर आली आहे. एका साडेपाच वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत १९ वर्षीय तरुणाने घाणेरडे कृत्य केले. मोबाईल खेळण्यास देऊन चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केला..या प्रकरणी शहरातून अत्यंत संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आरोपी चिखली तालुक्यातील मातला येथील असून त्याचे नाव अभिषेक सुरडकर असे आहे...
  पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा देऊळगाव राजात शिक्षणासाठी नातेवाईकांकडे राहतो. पीडित अल्पवयीन मुलाची आई एका खाजगी संस्थेत काम करते. ओळख असल्याने आरोपी तरुणाचे पीडित मुलाच्या घरी येणे जाणे असायचे. या ओळखीतून त्याने पीडित मुलाच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला होता.
मात्र त्याने विश्वासघात केला. घटनेच्या दिवशी पीडित मुलाच्या घरी कुणी नसतांना आरोपी अभिषेकच्या अंगातील सैतान जागा झाला. त्याने पीडित चिमुकल्याला मोबाईल खेळायला दिला, त्याचवेळी त्याने पीडित मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला.घडलेल्या घटना पीडित चिमुकल्याने कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर चिमुकल्याच्या वडिलांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपी अभिषेकला अटक केली आहे...