संतापजनक! बुलढाणा हादरले; १६ वर्षीय चिमुकलीवर निर्जनस्थळी नेऊन बलात्कार; उलट्या व्हायला लागल्यावर दवाखान्यात नेले, डॉक्टर म्हणे.....
बुलढाणा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीचा बालपणापासूनचा परिचित मित्र असलेल्या भीम नगरातील आदर्शने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर २०२५ रोजी आदर्श ने तिला एका निर्जन घरात नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला. अल्पवयीन असलेल्या कोवळ्या वयातील त्या मुलीला त्या संकटाची भीषणता तेव्हा उमगली नाही..
उलट्या व्हायला लागल्या अन्...
दरम्यान दोन दिवसापूर्वी पीडित मुलीला उलट्या व्हायला लागल्या, पोटात दुखू लागले..तिची तब्येत खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीअंती डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. पीडित मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी आदर्श नरवाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास बुलढाणा शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे करीत आहेत.